IPL मध्ये Pandya Brothers चा जलवा, रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं!

First brothers pair in IPL history: आयपीएलची स्टार जोडी म्हणजे पांड्या बदर्सने (Pandya Brothers) यंदा अनोखा विक्रम रचला आहे. त्यामुळे सध्या हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2023, 05:10 PM IST
IPL मध्ये Pandya Brothers चा जलवा, रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं! title=
Hardik and Krunal Pandya

Hardik and Krunal Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या यंदाच्या हंगामाचा थरार अंतिम टप्प्यावर वळला आहे. सर्व संघाचे आता हातावर मोजण्याइतकेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आता आगामी लढती अतितटीच्या होणार हे मात्र, निश्चित. अनेक रेकॉर्ड यावेळी मोडल्याचं पहायला मिळतंय. तर अनेक नवे विक्रम रचले देखील जात आहेत. अशातच आता आयपीएलची स्टार जोडी म्हणजे पांड्या बदर्सने (Pandya Brothers) यंदा अनोखा विक्रम रचला आहे. त्यामुळे सध्या हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.

एकाच संघाकडून खेळताना पांड्या ब्रदर्स म्हणजेच हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या (Hardik and Krunal Pandya) यांची ताकद दिसून येत आहे. मात्र, दोन्ही भावांनी दोन वेगवेगळ्या संघांची जबाबदारी स्वीकारली आहे. हार्दिक गुजरातकडून खेळतो, तर कृणाल लखनऊकडून मैदानात उतरतो. अशातच पंड्या बंधूंनी आयपीएलच्या इतिहासात (IPL History) एक अनोखा विक्रम केलाय, जो कोणत्याही बदर्स जोडींना करता आला नाही.

हार्दिक पांड्या गुजरातचं (GT) नेतृत्व सांभाळतो. संघाचा तो नियमित कर्णधार आहे. तर दुसरीकडे लखनऊचा (LSG) नियमित कर्णधार केएल राहूल (KL Rahul) सध्या जखमी असल्याने टीमची जबाबदारी कृणाल पांड्या याच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात दोन्ही भावांनी संघांची जबाबदारी स्विकारणं अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.

आणखी वाचा - IPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार!

दरम्यान, आयपीएलच्या 2022 च्या हंगामात हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सत्रात गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. त्यानंतर यंदा देखील गुजरातचा रथ यशस्वीरित्या पुढे नेण्यास हार्दिकला यश आलंय. तर दुसरीकडे चेन्नईविरुद्ध लखनऊसाठी (LSG) कृणालने कर्णधारपद सांभाळलं खरं पण पावसामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात संघाला 1 अंक मिळवून देण्यास कृणालला यश आलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

क्रिकेटमध्ये भावांच्या अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाचं प्रतिनिधित्व केलंय. इरफान पठाण-युसुफ पठाण, स्टीव्ह वॉ-मार्क वॉ, अ‍ॅडी फ्लॉवर-ग्रॅड फ्लॉवर अशी अनेक उदाहरणं देता येतील. काही दिवसांपूर्वी लखनऊ आणि गुजरात सामन्यानंतर हार्दिक आणि कृणाल यांनी एकमेकांच्या टीमचे टी-शर्ट अदलाबदल केले आणि एकमेकांना मिठीही मारली.