अखेर हार्दीक पांड्यानेच सांगितलं श्रीलंका दौर्‍यात नसण्याचं कारण ...

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पांड्याला श्रीलंकेच्या दौर्‍यात वगळ्यात आल्याने अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. 

Updated: Nov 14, 2017, 10:55 AM IST
अखेर हार्दीक पांड्यानेच सांगितलं श्रीलंका दौर्‍यात नसण्याचं कारण  ...  title=

मुंबई : भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पांड्याला श्रीलंकेच्या दौर्‍यात वगळ्यात आल्याने अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. 
हार्दिक पांड्या क्रिकेटच्या मैदानात जितकी धमाल करतो तेवढीच धमालमस्ती बाहेरही चालू असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सतत फॅन्सच्या संपर्कामध्ये असतो. पण सोमवारी त्याने थेट मीडियासमोर येऊन माहिती दिली.  

माझं शरीर थोडं थकलयं त्यामुळे मी आराम करत असल्याचे हार्दीक पांड्याने सांगितलं आहे. मात्र मला क्रिकेट बोर्डाने आराम करायला दिलेल्या या वेळेमध्ये जिममध्ये जाऊन माझा फीटनेस सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याची माहितीदेखील पांड्याने दिली आहे.

श्रीलंकेच्या टेस्टनंतर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यामध्ये तीन टेस्ट, सहा वनडे आणि तीन टी-20 ममॅच   खेळल्या   जाणार आहेत.  हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी उत्सुक असल्याची माहिती त्याने दिली आहे.  

एका न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या म्हणाला, ' माझं शरीर सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे थोडं थकलयं पण येत्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यामध्ये मला १०० % द्यायचे असतील तर हा ब्रेक गरजेचा होता. तसेच यादरम्यान क्रिकेटमधून आराम घेतला असला तरीही फीटनेस वाढवण्यासाठी जीममध्ये जाणार आहे.' 

हार्दिक पांड्यासाठी टर्निंग पॉईन्ट कोणता ? 

हार्दिकला हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला हा क्षण म्हणजे मुंबई इंडियंसकडून खेळायला मिळणं हा होता. कारण यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.  त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी टर्निंग पॉईंट असल्याचं हार्दिकने म्हटले आहे.