नाकावर राग आणि डोक्यात तिडीक, हर्षल पटेल आणि RR च्या फलंदाजाचा राडा, पाहा व्हिडीओ

हर्षल पटेलच्या नाकाला झोंबल्या मिरच्या, LIVE मॅचमध्ये फलंदाजाशी भिडला, पाहा व्हिडीओ  

Updated: Apr 27, 2022, 07:36 AM IST
नाकावर राग आणि डोक्यात तिडीक, हर्षल पटेल आणि RR च्या फलंदाजाचा राडा,  पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आयपीएलचे सामने अधिक चुरशीचे होत आहे. स्पर्धा अधिक रंजक होत असून प्लेऑफच्या दिशेनं चालली आहे. बंगळुरू विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा दोन खेळाडूंमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. 

राजस्थानचा रियान पराग आणि बंगळुरूचा बॉलर हर्षल पटेल आपापसात भिडले. त्यामुळे मैदानात काही मिनिटं तणावाचं वातावरण होतं. राजस्थान टीमने बंगळुरूचा पराभव केला आहे. 

मैदानात नेमका काय झाला वाद? 

सामन्यामध्ये हर्षल पटेल आणि रियान भिडल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राजस्थानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेल बॉलिंग करत होता. 

रियानने हर्षल पटेलची धुलाई केली. त्याने 31 बॉलमध्ये 56 धावा केल्या. रियान सामन्या संपल्यानंतर डगआऊटकडे जाताना हर्षलने त्याला डिवचलं आणि तिथे वाद सुरू झाला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हर्षल पटेल आणि रियान यांच्यात झालेल्या वादाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बंगळुरूला सामना गमवण्याची वेळ आली. तर बंगळुरूकडून कोहली पुन्हा फ्लॉपच ठरल्याचं पाहायला मिळालं. राजस्थानच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून सामना जिंकला. बंगळुरूवर 29 धावांनी विजय मिळवला.