Heinrich Klaasen stumping video : सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला आयपीएल 2024 च्या 23 व्या मॅचमध्ये एक अत्यंत रोमांचक सामन्यात 2 धावांनी पराभूत केलं. हा सामना पंजाबचे होमग्राउंड असलेल्या महाराजा यादवेंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज होती. जयदेव उनाडकटने शेवटच्या ओव्हरमध्ये 29 रन डिफेन्ड करत 2 धावांनी सामना आपल्या खिशात टाकला अन् दोन अंक खिशात घातले. या मॅचपेक्षा हेनरिक क्लासेनच्या स्ंटपिंगची चर्चा लोकांमध्ये होत आहे.
या सामन्यात हेनरिक क्लासेनने एका उत्कृष्ट स्टंपिंगमुळे शिखर धवनला तंबूत परत पाठवले होते. भूवनेश्वर कुमारच्या 5 व्या ओव्हरमध्ये शिखर धवनने पुढे जाउन कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या बॅटला न लागता सरळ क्लासेनच्या हातात गेला आणि एकदम स्फुर्तीत त्याने स्ंटपिंग करत धवनला फक्त 14 धावांवर आउट केलं. पण यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्या दमदार खेळीमुळे हा सामना अजून रंगतदार झाला होता.
Relive Heinrich Klaasen's brilliant piece of stumping
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema #TATAIPL | #PBKSvSRH | @SunRisers pic.twitter.com/sRCc0zM9df
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
हैदराबादने दिलेल्या 183 धावांच्या बदल्यात पंजाब किंग्स ही सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये डगमगली, सुरूवातीला विकेट गमावल्यानंतर पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी इनिंगला सावरलं आणि मॅचला शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचलं, पण दोघं फलंदाजांच्या हाताला यश आलं नाही. दुर्देवाने सनरायझर्स हैदराबादने फक्त 2 धावांनी या सामन्यात हार पत्करावी लागली.
नितीश रेड्डी याने फलंदाज आणि गोलंदाजीत ऑलराउंड प्रदर्शन करत प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळवला आहे. नितीशने 37 बॉलमध्ये ताबडतोब 67 धावांची खेळी खेळत पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. नितीश रेड्डीने त्याच्या या खेळीत एकूण 4 चौके आणि 5 षटकार लगावले होते. याव्यतीरिक्त अब्दुल समद याने पण12 बॉलमध्ये 25 धावांची वेगवान खेळी खेळली, हैदराबादच्या पंजाबविरूद्ध या विजयानंतर हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आला आहे.