हिमा दासच्या कोचवर लैंगिक शोषणाचा आरोप

 २० वर्षाच्या महिला एथलीटने हा आरोप केलायं. 

Updated: Jul 29, 2018, 10:51 AM IST
हिमा दासच्या कोचवर लैंगिक शोषणाचा आरोप

नवी दिल्ली : भारतीय एथलिट हिमा दासचे कोच निपोन दास यांच्यावर लैंगिग शोषणाचा आरोप लावण्यात आलायं. २० वर्षाच्या महिला एथलीटने हा आरोप केलायं. आसामच्या स्पोर्ट्स अॅण्ड यूथ वेल्फेअर डिपार्टमेंटचे कमिशनर आणि सेक्रेटरी आशुतोष अग्निहोत्रीने या घटनेला पुष्टी दिलीयं. कोच निपोन यांनी हे आरोप झिडकारले आहेत.

लैंगिक शोषण 

महिलेने चुकीचे आरोप लावले असुन तिला मी गुवाहटीमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य एथलेटिक्स चॅम्पियनशिप (२६ ते २९ जून) मध्ये राज्याच्या टीममध्ये जागा देऊ शकलो नाही. इंटरस्कूल नॅशनल स्पर्धेत ती सहभागी होती. सौरासाजीमध्ये ट्रेनिंगदरम्यान निपोन दासने लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला एथलिटने केलायं. जर याबद्दल कोणाला सांगितल्यास ट्रेनिंग आणि खेळाच्या आयोजनातून काढून टाकण्याची धमकीही त्यांनी दिल्याचे तिने सांगितले.

खोटे आरोप 

ती मला नेहमी आसाम टीमच्या निवडीसाठी दबाव टाकायची असे निपोन यांनी सांगितले. दूसरे खेळाडू तिच्यापेक्षा चांगले असल्याने मी असे करू शकत नव्हतो. राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये राज्याच्या टीममध्ये तिला जागा न मिळाल्याने माझ्यावर खोटे आरोप आणि तक्रार केल्याचे निपोन यांनी सांगितले.