भारतीय फुटबॉलपट्टूचा मोटारसायकल अपघातात मृत्यू

भारतीय फुटबॉलपट्टूचा बाइक अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर येतेयं.

Updated: Jul 29, 2018, 08:34 AM IST
भारतीय फुटबॉलपट्टूचा मोटारसायकल अपघातात मृत्यू

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉलपट्टूचा बाइक अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर येतेयं. कालिया कुलोथुन्गन असे या मृत्यूमुखी पडलेल्या खेळाडुचे नाव आहे. हा खेळाडु ईस्ट बंगाल क्लबमधुन खेळत होता.

मिडफील्डर कालिया 

कालिया कुलोथुन्गन ईस्ट बंगालच्या माजी मिडफिल्डर होता. तामिळनाडुमध्ये तो राहत असलेल्या तंजावुरमध्ये झालेल्या रस्ता अपघातात त्याला आपला प्राण गमवावा लागला. आलेल्या वृत्तानुसार, काल रात्री दोनच्या सुमारास कालिया कुलोथुन्गन मोटारसायकलवरून लोखंडी डिवायडरवर आदळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ईस्ट बंगालमधून ३ वर्षे खेळला

कालियाचे वय ४० वर्षे होोते. त्याने २००२ ते २००५ पर्यंत मिडफिल्डर म्हणून बंगालसाठी फुटबॉल खेळले. कोलकात्यातील त्याच्या चाहत्यांमध्ये तो 'कुलो'नावाने प्रसिद्ध होता.