Vidya Balan | या स्फोटक भारतीय क्रिकेटरला आवडते विद्या बालन, अभिनेत्रीला डिनरला घेऊन जाण्याची इच्छा

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.   

Updated: Jan 6, 2022, 07:17 PM IST
Vidya Balan | या स्फोटक भारतीय क्रिकेटरला आवडते विद्या बालन, अभिनेत्रीला डिनरला घेऊन जाण्याची इच्छा title=

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. विद्याच्या प्रत्येक चाहत्याला ती आवडते. भारताचा एक असा क्रिकेटर आहे ज्याला विद्याला डिनरला न्यायचं आहे. (himachal pradesh cricketer prashant chopra wants go with actress vidya balan for dinner date)  

कोण आहे तो क्रिकेटर? 

स्टार क्रिकेटर प्रशांत चोपडाला (Prashant Chopra) विद्या बालनला डिनरला न्यायचं आहे. प्रशांत हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत डिनर डेटवर जायचंय, असा सवाल प्रशांतला विचारण्यात आला. यावर प्रशांतने विद्या बालनला डिनर डेटवर न्यायचं असल्याचं म्हणाला.   

हिमाचल प्रदेशने तामिळनाडूला पराभूत करत पहिल्यांदा रणजी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रशांतने या स्पर्धेतील 8 सामन्यात 57 च्या सरासरीने 456 धावा केल्या. तसेच प्रशांतने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 5 मॅचमध्ये 148 धावा केल्या.