वाढदिवस विशेष : विराट कोहली का ठरतोय सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक रेकॉर्डसाठी धोका

क्रिकेट विश्वाचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याचे रेकॉर्ड्स मोडणं शक्य नाही. असं मत भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक जाणकार व्यक्तींचेही होते.

Updated: Nov 5, 2017, 08:58 AM IST
वाढदिवस विशेष : विराट कोहली का ठरतोय सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक रेकॉर्डसाठी धोका title=

मुंबई : क्रिकेट विश्वाचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याचे रेकॉर्ड्स मोडणं शक्य नाही. असं मत भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक जाणकार व्यक्तींचेही होते.

गेल्या चार वर्षांत क्रिकेट विश्वात इतके बदल झाले की सचिनचे सारेच रेकॉर्ड्स धोक्यात आले. हळूहळू भारतीय क्रिकेटपटूचा ते रेकॉर्ड्स मोडण्याची क्षमता ठेवतात. यापैकी एक नाव म्हणजे विराट कोहली. 

धडाकेबाज आणि युवा क्रिकेटर विराट कोहली सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. आज   नोव्हेंबर  २०१७ रोजी विराट २९ वर्षांचा झाला आहे. अवघ्या २३ वर्षांचा असतातना दोन वर्ल्डकप्स जिंकणार्‍या टीमचा हिस्सा होणारा विराट हा बहुधा एकमेव क्रिकेटर असेल. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारतीय संघाने अंडर १९ मध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला. सोबतच २०११ मध्येही तो ज्या टीमचा भाग होता तो संघ वर्ल्डकप जिंकला. 

धडाकेबाज फलंदाज
विराटने आपल्या ९ वर्षांच्या वनडे कारकीर्दीमध्ये  ३२ शतकं झळकावली आहेत. तुलनेत कसोटी सामन्यांमध्ये त्याचा धावा करण्याचा वेग कमी आहे. मात्र टी २० खेळात सर्वाधिक धावा बनवणारा विराट हा भारतीय खेळाडू आहे. 

  नव्या रेकॉर्डची अपेक्षा 
विराट गेली ९ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. यादरम्यान विराट सचिन तेंडुलकरच्या अनेक विश्वविक्रमांच्या जवळ आहे. त्यामुळे पुढेही विराटच्या  खेळात  सातत्य राहिल्यास तो सचिनचे रेकॉर्ड्स मोडून नवे विक्रम रचू शकतो. 

धावांचा विक्रम
 सध्या विराटच्या तिन्ही प्रकारातील धावांची गणती केल्यास ती 15566 इतकी आहे. विराटच्या करिअरचा विचार केल्यास तो  35142 पर्यंतचा टप्पा गाठू शकतो. सचिन तेंडुलकरने त्याच्या करिअरमध्ये ३४३५७ धावा केल्या आहेत. 
 
शतकांचा विक्रम 
वनडे मध्ये विराटच्या धावांचा वेग पाहता तो शतकांचाही विक्रम करू शकतो. सुमारे ६१ शतकं त्याच्या वनडे करिअरमध्ये होऊ शकतात. सचिनने एकूण १०० शतकं लगावली आहेत. विराट एकूण ११० शतकांचा विक्रम करू शकतो.