हैदराबाद : सिद्धार्थ कौल आणि शाकीब अल हसनची यांची दमदार गोलंदाजीनंतर शिखर धवनने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर टी-२० सामन्यात सोमवारी एकतर्फी झालेल्या सामन्यात राजस्थानला नऊ विकेटनी हरवत हैदराबादने आयपीएलची सकारात्मक सुरुवात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने एक विकेट गमावताना १२७ धावा केल्या आणि विजय मिळवला.
यात धवनने ५७ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ७७ धावांची नाबाद खेळी केली. कौल(१७ धावांवर २ विकेट) आणि शाकीब (२३ धावांवर २ विकेट) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा डाव नऊ बाद १२५ धावांवर गारद झाला. हैदाराबादच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या..
हैदराबादने टॉस जिंकताना राजस्थानला पहिल्यांदा गोलंदाजीस बोलावले. राजस्थानच्या केवल ४ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली. संजू सॅमसनने ४९ धावांची खेळी केली. रहाणेने १३ धावा केल्या. त्रिपाठी १७ धावांवर बाद झाला तर गोपाळने १८ धावा केल्या. इतर फलंदाज एकेरी धावसंख्या करुन बाद झाले.
राजस्थानने ठेवलेले हे आव्हान पूर्ण करताना हैदारबादने केवळ एक विकेट गमावला. हैदराबादकडून धवन ७७ धावांवर तर केन विल्यमसन्स ३६ धावांवर नाबाद राहिला.