वाढत्या वयाच्या प्रश्नावर धोनीचा सिक्सर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. 

Updated: Jul 1, 2017, 05:56 PM IST
वाढत्या वयाच्या प्रश्नावर धोनीचा सिक्सर title=

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. 

या तिसऱ्या सामन्यात भारताने ९३ धावांनी विजय मिळवला. सामन्यातील या खेळीबाबत धोनी चांगलाच खुश आहे. वाढत्या वयाप्रमाणे तुझा खेळही अधिक बहरतोय का असा प्रश्न धोनीला विचारला असता तो म्हणाला, हे वाईनप्रमाणे आहे. कठीण खेळपट्टीवर चांगली खेळी केल्याबद्दल धोनीने यावेळी समाधान व्यक्त केले. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-०ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने तो सामना होऊ शकला नाही. त्यानंतर सलग दोन सामन्यांत भारताने विजय मिळवत आघाडी घेतलीये.