भारतीय महिला क्रिकेट टीमकडून इंग्लंडचा धुव्वा; मात्र आयसीसीने केली कारवाई

भारतीय महिला क्रिकेट टीमविरुद्ध आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. 

Updated: Jul 13, 2021, 03:00 PM IST
 भारतीय महिला क्रिकेट टीमकडून इंग्लंडचा धुव्वा; मात्र आयसीसीने केली कारवाई title=

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमने दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाने सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधलीये. मात्र असं असूनही भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे स्लो ओव्हर टाकल्याप्रकरणी टीम इंडियाला हा दंड ठोठावण्यात आला आहे. 

हा दंड ठोठावल्यामुळे भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागणार आहे. आयसीसीकने सोमवारी भारतीय टीमवर ही कारवाई केली आहे.

भारतीय महिला टीमला निर्धारित वेळापेक्षा मागे होती. यामुशे सामना रेफरी फिल विटिक्सने संघाला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान यासंदर्भात कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या कारणास्तव औपचारिक सुनावणीची आवश्यकता नाही. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, ओव्हरची गती कमी राखल्याबद्दल खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

इंग्लंडचा डाव

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झटपट 2 धक्के दिले. मात्र त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करण्यात आली. त्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. मात्र त्यानंतर भारतीय महिला गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. तसेच धमाकेदार फिल्डिंगच्या जोरावर इंग्लंडच्या 4 फलंदाजांना रनआऊट केलं. 

निर्णायक क्षणी केलेल्या धमाकेदार फिल्डिंगच्या जोरावर भारताचा 8 धावांनी विजय झाला. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टने सर्वाधिक 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार हेदर नाईटने 31 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांना मैदानात टीकू दिले नाही. 

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फिल्डिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली.  स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या सलामी जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. या जोडीने पहिल्या 8.5 ओव्हरमध्ये 70 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर स्मृती 20 धावा करुन माघारी परतली. 

त्यानंतर लगेचच शेफाली 48 धावांवर आऊट झाली. अवघ्या 2 धावांनी तिचं अर्धशतक हुकलं. यानंतर ठराविक अंतराने भारताने गमावल्या त्यामुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 148 धावाच करता आल्या.