close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निलंबन, आयसीसीची मोठी कारवाई

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय 

Updated: Jul 19, 2019, 09:04 AM IST
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निलंबन, आयसीसीची मोठी कारवाई

लंडन : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने झिम्बॉम्बे क्रिकेट बोर्डावर ही कारवाई झाली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निलंबन झाल्याने त्यांना आयसीसीकडून मिळणारी फंडींग आता थांबेल. तसेच आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमात झिम्बाब्वे टीम सहभागी नसेल. इतकंच नव्हे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मेन्स टी २० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये झिम्बाब्वेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची निवडणूक पुन्हा होईल आणि त्यांच्या प्रगतीची समीक्षा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बोर्ड मिटींगमध्ये केली जाईल असे आयसीसीने म्हटले आहे. कोणत्याही सदस्यावर बंदी आणण्याचा निर्णय हा गंभीर आहे. पण आम्हाला खेळाला राजकिय हस्तक्षेपापासून दूर ठेवायचे असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटले. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डातर्फे आयसीसी संविधानाचे उल्लंघन झाले. त्यामुळे हे कायम सुरु राहण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही असेही ते म्हणाले. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या संविधानानुसार चालावे असे आयसीसीला वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.