आता 'टप्प्यात' कार्यक्रम होणार, T 20 World Cup 2021 आधी आयसीसीचा मोठा निर्णय

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.  

Updated: Oct 10, 2021, 03:58 PM IST
आता 'टप्प्यात' कार्यक्रम होणार, T 20 World Cup 2021 आधी आयसीसीचा मोठा निर्णय title=

दुबई : आयपीएल 14 व्या मोसमानंतर (IPL 2021)  क्रिकेटच्या महासंग्रमाला सुरुवात होत आहे. दुबई आणि ओमानमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला आणखी रंगतदार बनवण्यासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे ही स्पर्धेत आणखी चुरस पाहायला मिळणार आहे. (icc t 20 world cup 2021 drs will be used for the 1st time in will get 2 chances of review in every innings)

नेमका निर्णय काय?

टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या स्पर्धेत डीआरएसचा (Decision Review System) वापर करण्यात येणार आहे. आयसीसीने या बाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान दोन्ही संघांना डीआरएसनुसार 2 रिव्हव्यू मिळणार आहेत.

साधारणपणे टी 20 सामन्यात एका टीमला डावात फक्त एकच रिव्हव्यू घेता येतो. मात्र कोरोना काळात सामन्यांमध्ये अनुभवी पंच नव्हते. त्यामुळे या अनुभवी अंपायर्सची अनुपस्थिती लक्षात घेता आयसीसीने एक रिव्हव्यू वाढवण्याचा निर्णय घेतला.

आयसीसीच्या या निर्णयानंतर टी 20 आणि वनडेतील प्रत्येक डावात दोन्ही संघांना 2 वेळा रिव्हव्यू घेता येतो. तर कसोटी सामन्यातील प्रत्येक डावात दोन्ही संघांना प्रत्येकी 3 वेळा डीआरएस मिळतो.  

किमान षटकांच्या नियमांमध्येही बदल 

आयसीसीने डीआरएससह आणखी एक महत्तावाचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे सामन्यादरम्यान किंवा सामन्याआधी पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं कमी केली जातात. परिणामी सामन्याचा निकाल हा डकवर्थ लूईस नियमानुसार लावला जातो.

पावसाच्या व्यत्ययाचा फटका कोणा एका टीमला बसतो. त्यामुळे आयसीसीने निर्णय घेतलाय.

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, टी 20 वर्ल्ड स्पर्धेतील साखळी फेरीतील (League Round Match) सामना निकाल काढण्यासाठी दोन्ही संघाना किमान 5 ओव्हर्स बॅटिंग करावी लागणार आहे.

तसेच नॉकआऊट राऊंड अर्थात क्वार्टर, सेमी फायनल आणि फायनल या सामन्यांच्या निकालासाठी दोन्ही संघांना किमान 10 ओव्हर्स खेळावं लागणार आहे.

गत टी 20 वर्ल्ड कपमध्ये डीआरएस नाही

आयसीसीच्या प्रत्येक सामन्यात डीआरएस प्रणालीचा वापर केला जातो. मात्र 2016 पर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये डीआरएसची सोय नव्हती. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप 2016 मध्येही डीआरएसचा वापर करता आला नव्हता.

वेस्टइंडिजमध्ये 2018 साली महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत पहिल्यांदाच डीआरएसचा वापर करण्यात आला.

पंचाची पोलखोल तर कर्णधारांना डोकेदुखी

प्रत्येक खेळात पंचांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. मग तो बरोबर असो किंवा चूक. मात्र डीआरएसमुळे फिल्ड अंपायरच्या निर्णयाला आव्हान देता येते. यावेळेस टी 20 वर्ल्ड कपमध्ये डीआरएसचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याने पंचांची पोलखोल होणार आहे. तर कर्णधारांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.

अनेकदा अंपायर नजरचुकीमुळे किंवा चुकीने आऊट असलेल्या फलंदाजाला नाबाद घोषित करतात. तर नॉटआऊट असलेल्या बॅट्समनला आऊट घोषित करतात. हेच गोलंदाजांबाबतही घडतं. याचा फटका हा दोन्ही संघांना बसतो.

मात्र या डीआरएसच्या सुविधेमुळे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत कर्णधाराला पंचांच्या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. त्यामुळे डीआरएस रिव्हव्यूची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे.