T20WC final match Australia vs New Zealand : T20 world cup अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी होणा-या या सामन्याकडे किवी संघ इतिहास बदलू शकतो की नाही याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. वास्तविक, ICC स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी (NZ vs Aus) होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हे दोन्ही संघ 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आणि त्यानंतर 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते, मात्र दोन्ही वेळा किवी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ( New zealand vs Australia T20 final )
या दोन अंतिम सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याआधीही दोनदा आमने-सामने आले होते, पण त्यातही निकाल सारखाच लागला. 1996 च्या विश्वचषकातही न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता, तर 2006 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही किवी संघाचा पराभव झाला होता.
आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत चारवेळा भिडले आहेत आणि प्रत्येक वेळी किवी संघाला पराभव पत्करावा लागला आहे. 1996, 2006, 2009 आणि 2015 या वर्षानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत, त्यामुळे यावेळी न्यूझीलंड संघ इतिहास बदलू शकणार का, हा मोठा प्रश्न आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमने-सामने
1996 WC - ऑस्ट्रेलिया जिंकला
2006 CT - ऑस्ट्रेलिया जिंकला
2009 CT - ऑस्ट्रेलिया जिंकला
2015 WC - ऑस्ट्रेलिया जिंकला
पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.