टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण

ICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.

राजीव कासले | Updated: Jun 19, 2024, 03:42 PM IST
टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण title=

ICC T20 Ranking : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये आते सुपर-8 चा थरार सुरु होईल. यंदाच्या स्पर्धेत 20 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी आठ संघांनी सुपर-8 (Super-8) मध्ये धडक मारली आहे. सुपर-8 मध्ये दोन ग्रुप बनवण्यात आले असून ग्रुप-1 मध्ये भारतासह बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांचा समावेश आहे. तर ग्रुप-2 मध्ये वेस्टइंडिज, यूएसए, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. 

आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर
टी20 वर्ल्ड कपची धूम सुरु असतानाच आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. क्रमवारी मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis) टी20 क्रिकेटमध्ये नंबर वन ऑलराऊंडर बनला आहे. स्टॉईनिसच्या खात्यात 231 गुण जमा झाले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार हसारंगा 222 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर, बांगलादेशचा शाकिब अल हसन 218 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी 213 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

सूर्या टॉपवर, विराट-रोहितची घसरण
टी20 फलंदाजी क्रमवारीत टॉप-4 मध्ये कोणताच बदल झालेला नाही. टीम इंडियाचा टी20 स्पेशलिस्ट सूर्यसुमार यादव 837 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फिल सॉल दुसऱ्या, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या आणि मोहम्मद रिझवान चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडनेही पाच स्थानांची मोठी झेप घेत थेट पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे. तर टी20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या वेस्ट इंडियाचा आक्रमक फलंदाज निकोलस पुरनने आठ स्थानांची झेप घेत 11 वा क्रमांक गाठला आहे. 

भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वालला क्रमवारीत नुकान झालं आहे. एक स्थानाची घसरण होऊ जयस्वाल सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचीही घसरण झाली आहे. विराट आणि रोहितला दोन स्थानांचं नुकसान झालं असून विराट कोहली 50 व्या तर रोहित शर्मा 51 व्या स्थानावर आहे. रिंकू  सिंह 2 स्थान खाली घसरला असून तो आता 37 व्या क्रमांकावर आहे. 

अक्षर पटेलचीही घसरण
टी20 गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल राशिद पहिल्या अव्वल स्थानावर आहे. तर वेस्टइंडिजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसैन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला दोन स्थानांचं नुकसान झालं असून तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे.