मुंबई : भारतीय टीमसाठी आणि सूर्यकुमार यादवसाठी आनंदाची बातमी आहे. ICC च्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव अखेर पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 फलंदाज ठरला आहे. यामध्ये त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही मागे टाकलं आहे. सध्या भारत विरूद्ध बांग्लादेश सामना सुरु आहे. अशातच आयसीसीने ताजा आकडेवारी जाहीर केली आहे.
आयसीसीने ताज्या टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवचे 863 पॉईंट्स आहेत. तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचे 842 पॉईंट्स आहेत. त्यामुळे पॉईंट्सच्या बाबतीत सूर्या फार पुढे गेलाय. सध्या सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या याच फॉर्मचा फायदा त्याला T20 वर्ल्ड कपमध्ये मिळालाय. या T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने केलेल्या सर्वाधिक रन्सच्या यादीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
T20 आयीसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप-10 मध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि दहाव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. टी-20 वर्ल्डकमध्ये विराट कोहली देखील सध्या पाऊस पाडतोय.
Suryakumar Yadav ends Mohammad Rizwan's reign at the top of the T20I batting rankingspic.twitter.com/dcj2gZYHjn
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 2, 2022
सूर्यकुमार यादवने टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या 3 सामन्यात एकूण 134 रन्स केलेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 15, नेदरलँडविरुद्ध 51 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 रन्स केलेत. 2022 मध्ये, सूर्यकुमार यादव T20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इतकंच नाही तर यावर्षात तो जगातील सर्वाधिक रन्स करणाराही खेळाडू ठरलाय.
बांगलादेशने (Bangladesh) टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजीला उतरली होती. मात्र टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2 धावावर बाद झाला. तर के एल राहूलची बॅट बांगलादेश विरूद्ध काहीशी तळपली आहे. त्याने 32 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 4 सिक्स आणि 3 फोर मारले आहेत. सुर्यकुमार 30 धावा करू शकला. हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल एकेरी धावसंख्या करून बाद झाले आहेत. अश्विन 13 धावा करून नाबाद राहिला.
टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) एकाकी झूंज दिली आहे. विराटने 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे. या एकाकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 184 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान असणार आहे.