अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्या ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतर आता सलग दुसरा विजय मिळवला आहे.

Updated: Jan 16, 2018, 03:32 PM IST
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय title=

मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्या ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतर आता सलग दुसरा विजय मिळवला आहे.

भारताने सलग दुसरा विजय मिळवत पापुआ न्यू गिनीया संघावर १० विकेट्सने मात दिलीये. मुंबईचा पृथ्वी शॉ हा या संघाचा कर्णधार असून त्याने दमदार खेळी करत हा विजय खेचून आणला आहे. याआधी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यात त्याने ९४ रन्सची दमदार खेळी केली होती. 

पहिल्यांदा गोलंदाजी

टॉस जिंकून कर्णधार पृथ्वी शॉ याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पपुआ न्यू गिनीया संघाला ६४ रन्सवर ऑलआऊट केले. नंतर या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. 

किती होतं टार्गेट?

टीम इंडियाने पपुआ न्यू गिनी संघाला २१.४ ओव्हर्समध्ये केवळ ६४ रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने केवळ ८ ओव्हर्समध्ये ६७ रन्स करत हा विजय मिळवला. पृथ्वी शॉ याने केवळ ३९ बॉल्समध्ये १२ फोर लगावत ५७ रन्स केले. तर मनजोत कालरा ९ रन्स करून नाबाद राहिला. या सामन्यात अनुकूल रॉय याला ‘मॅन ऑफ द मॅच’ सन्मान देण्यात आला. त्याने या सामन्यात ५ विकेट घेतल्या. 

पृथ्वी शॉचं अर्धशतक

कर्णधार पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलियानंतर पपुआ गिनी विरूद्धही अर्धशतक ठोकलं. शॉने केवळ ३९ बॉल्समध्ये १२ फोरच्या मदतीने ५७ रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलिया विरूद्ध पृथ्वीने ९४ रन्सची खेळी केली होती. 

या सामन्यातही पुथ्वी शॉ याने अर्धशतक ठोकलं आहे. त्याने ३८ बॉल्समध्ये ५० रन्स केलेत. टीम इंडियाच्या अनुकूल रॉय या गोलंदाजाने तब्बल ५ विकेट घेतल्या. अवघ्या एकूण ६४ धावांवर टीम इंडियाने पापुआ न्यू गिनीया टीमच्या १० विकेट घेतल्या.