ऑकलंड : वूमन्स टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील (WWC 2022) दुसरा विजय साजरा केला. टीम इंडियाने (Womens Team India) स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies Womens) 155 धावांनी धुव्वा उडवला. ओपनर स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या दोघी विजयाच्या शिल्पकार ठरल्या. या दोघांनी शानदार शतक ठोकलं. स्मृती मंधानाने 123 तर हरमनप्रीतने 109 धावा ठोकल्या. (icc wwc 2022 wiw vs iw womens team india harmanpreet kaur become 1st indian who scored most century in world cup)
हरमनप्रीतने 107 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 109 धावांची खेळी केली. हरमनप्रीतचं हे वर्ल्ड कपमधील तिसरं शतक ठरलं. यासह हरमनप्रीतने पराक्रम केला आहे. हरमनप्रीत टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं लगावणारी फलंदाज ठरली.
हरमनने या शतकासह कॅप्टन मिताली राज आणि स्मृती मंधानाला पछाडलं आहे. या दोघांनी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 2 शतक लगावलं आहे.
मिताली आणि स्मृती टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. स्मृतीने दुसरं शतक हे याच सामन्यात लगावलंय.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत हरमनप्रीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा जान ब्रिटिन आणि चार्लोट एडवर्ड्स या ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजांच्या नावे आहे.
या दोघांनी प्रत्येकी 4 शतकं लगावली आहेत. टीम इंडियाला या स्पर्धेत साखळी फेरीतील आणखी 4 सामने खेळायचे आहेत. यामुळे हरमनप्रीत कौरकडे या स्पर्धेतच या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी आणि रेकॉर्ड ब्रेक करण्याची दुहेरी संधी आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडियांचं वेळापत्रक (Womens One Day World Cup 2022 Team India Schedule)
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड - 10 मार्च
टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज -12 मार्च
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड -16 मार्च
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया -19 मार्च
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश - 22 मार्च
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 मार्च
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.
Woh kaun hai
Woh KAUR hai @ImHarmanpreet is the first Indian player to score 3ODI World Cup .#CWC22 pic.twitter.com/TEqZS5WRG6— Women’s CricZone @ #CWC22 (@WomensCricZone) March 12, 2022