Cricket in Olympics : ऑलिम्पिक समितीने 2028 साली होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मंजूरी दिलीये. त्यामुळे आता तब्बल 123 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. 1900 मध्ये शेवटचा सामना खेळवला गेला होता. अशातच आता ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला जाणार असल्याने क्रिडाप्रेमी उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय. मात्र, यानिमित्ताने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातायेत. क्रिकेटचा समावेश केला तर किती ओव्हरचे सामने होतील? आणि कोणते संघ पात्र ठरतील? असे अनेक प्रश्न विचारले जातायेत. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन आणि वर्ल्ड कप विनिंग खेळाडू रिकी पॉटिंग याने मोठं वक्तव्य केलंय. (If cricket is included in the Olympics World Cup champion Ricky Potting big statement)
क्रिकेटसाठी ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. मी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विविध समित्यांचा सदस्य आहे. प्रत्येकवेळी जेव्हा एखादा अजेंडा ठरवला जातो. तेव्हा आमचा प्रयत्न असतो की क्रिकेटला कशाप्रकारे ऑलिम्पिक स्पर्धेत घेतलं जाईल, असं रिकी पॉटिंगने म्हटलं आहे. आता ही गोष्ट होताना दिसतीये. चार वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होईल. मला वाटतं की अमेरिकेमध्ये क्रिकेट रुजवण्याची मोठी संधी आहे. मात्र, ऑलिम्पिक खेळ हा फक्त यजमान देशाबद्दल नाहीत. जे प्रेक्षक पाहत आहेत, ते देखील या खेळाला अधिक लोकप्रिय बनवतात, असंही रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.
जगभरातील अनेक लोक ऑलिम्पिक खेळ पाहत असतात, त्यामुळे आमचा खेळ नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. क्रिकेटसाठी ही खूप सकारात्मक गोष्ट ठरणार आहे, असं मत देखील रिकी पॉटिंगने मांडलंय. रिकी पॉटिंगच्या या वक्तव्याचं क्रिडाविश्वातून स्वागत केलं जात आहे.
दरम्यान, 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, क्रिकेट आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश होणार आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी या सर्व खेळाचं स्वागत केलं आणि विराट कोहलीचा उल्लेख केला होता. त्यामुळे विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का? असा सवाल विचारला जात होता. तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एशियन गेम्सनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेट संघ गोल्ड मेडल मिळवेल अशी अपेक्षा आहे.