राजकोट : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली, त्यामुळे ऋषभ पंत दुसऱ्या वनडेमध्ये खेळू शकला नाही. पहिल्या वनडेमध्येही पंत विकेट कीपिंगला आला नाही. ऋषभ पंतच्याऐवजी केएल राहुल विकेट कीपिंग करत आहे.
दुसऱ्या वनडेला मुकलेला ऋषभ पंत तिसरी वनडे खेळेल का नाही, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशचा विकेट कीपर केएस भरत याला पंतचा बदली खेळाडू म्हणून भारतीय टीममध्ये घेण्यात आलं आहे. १९ जानेवारीला बंगळुरुमध्ये या सीरिजची तिसरी आणि शेवटची वनडे मॅच खेळवण्यात येणार आहे.
ईशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन्ही विकेट कीपर हे सध्या न्यूझीलंडमध्ये भारत-ए कडून खेळण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचाच टीममध्ये समावेश होऊ शकत नव्हता.
केएस भरतने ७४ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ३७.६६च्या सरासरीने ४,१४३ रन केले आहेत. २६ वर्षांचा केएस भरत रणजीमध्ये आंध्र प्रदेशच्या टीमचा महत्त्वाचा हिस्सा आहे. केएस भरतला दुसऱ्या वनडेमध्ये संधी मिळालेली नाही.