IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत

IND Vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परतला असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यामागच काय कारण आहे याबद्दल जाणून घेऊया...

Updated: Feb 20, 2023, 11:02 AM IST
IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत title=

IND Vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सगल दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. दोन्ही कसोटी सामने तिसऱ्या दिवशी संपले. टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border–Gavaskar Trophy) वापसीसाठी कांगारूंना पुढचे दोनही कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. अशातच आता ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला असल्याची माहिती समोर येत आहे. 

पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची कामगिरी तशी फारशी चांगली नव्हती. दोन सामन्यात त्याला 39.66 च्या सरासरीने फक्त तीनच विकेट घेता आल्या आहेत. जर कमिन्स तिसऱ्या कसोटीआधी परतला नाही तर उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ नेतृत्व करू शकतो. 2018 मध्ये झालेल्या सँडपेपर गेट प्रकरणाआधीपर्यंत स्मिथ कर्णधार होता. नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 91 धावा करू शकला होता. त्यानतंर पुन्हा दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करता आलं नाही. भारतीय फिरकीविरोधात रिव्हर्स आणि स्वीप मारण्याच्या नादात फलंदाज बाद होत गेले. रविवारी दुसऱ्या डावात 1 बाद 61 धावांवरून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 113 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अखेरच्या 9 विकेट फक्त 48 धावात गमावल्या. भारताने गेल्या 36 वर्षांपासून दिल्ली कसोटीत पराभव न पत्करण्याचा विक्रम कायम ठेवला.

वाचा: भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना, टीव्हीवर कधी आणि कुठे पाहता येईल ?  

अशातच आता ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्स (Australian captain Pat Cummins) अचानक मायदेशी परतला आहे. कमिन्सच्या अचानक मायदेशी परतण्यामागे वैयक्तिक कारणं सांगितली जात आहेत. पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार आहे. जर पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतला नाही तर इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळू शकतो.