World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.

Updated: Dec 18, 2022, 11:48 AM IST
World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास  title=

India Beat Bangladesh:  बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (Ind vs Bang ) टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र काल (17 डिसेंबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांच्या T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला. भारताने T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 277/2 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला. यामधून असून दिसून आले की, जे मुख्य टीम इंडियाला (team india) जमलं नाही ते अंधं टीम इंडियाने (team india) करून दाखवलं आहे. 

17 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांच्या T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला. यासह भारताने तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 गडी गमावून 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 3 बाद 157 धावाच करू शकला. भारताने इतिहास रचला आणि तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली.

वाचा : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा 

भारताने यापूर्वी 2012, 2017 आणि पुन्हा 2022 मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सुनील रमेश (नाबाद 136) आणि अजय कुमार रेड्डी (100) यांच्या शतकी खेळीमुळे 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकांत केवळ 157 धावाच करता आल्या.

तसेच सामनावीराचा मानकरी ठरलेल्या सुनीलने स्पर्धेतील सलग तिसरे शतक झळकावत 63 चेंडूंत 24 चौकार व एका षटकारासह 136 धावा केल्या, तर कर्णधार अजयने 50 चेंडूंत 18 चौकारांसह 100 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून सलामीवीर सलमानने 66 चेंडूत 77 धावा केल्या, तरीही त्याला कोणतीही साथ मिळाली नाही. भारताने तिसऱ्यांदा अंधांचा टी-20 विश्वचषक जिंकला आहे, तर याआधी 2012 आणि 2017 मध्येही या संघाने विजेतेपद पटकावले होते.

भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराद ठाकुर यांनी अंधांसाठीच्या वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजेता झाल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.