WTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.

Updated: Dec 25, 2022, 01:14 PM IST
WTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल title=

WTC Points Table : भारताने ढाका कसोटीत बांगलादेशवर सनसनाटी विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले.  भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 गडी राखून पराभव केला आहे. मात्र आता भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. त्यामुळे भारतीय संघ आता अंतिम फेरीत प्रवेश करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

भारताने चितगाव कसोटी जिंकली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. त्यानंतर भारताने चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. आता ढाका कसोटीतही विजय मिळवून भारताने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया 76.92 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिका (54.55%) आणि श्रीलंका (53.33%) अनुक्रमे 3 आणि 4 वर भारताच्या अगदी मागे आहेत. 

पुढील कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी सध्या फक्त तीन संघ लढत आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत जाणे जवळपास निश्चित आहे. फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारताला स्वत:ला चांगली कामगिरी करावी लागेल आणि दुसऱ्या संघाकडून खराब कामगिरीची आशा करावी लागेल. भारताला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केल्यास त्यांना कसोटी चॅम्पियनशिपमध्ये महत्त्वाचे गुण मिळतील आणि अंतिम फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा आणखी बळकट होतील.

वाचा : दे दणादण...! 'या' खेळाडूने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिरावला 

WTC 23 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अंतिम शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पाचवा संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघ याआधीच बाहेर पडले आहेत.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला वजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला.