T20 World cup 2022 : भारत आणि बांगलादेशमधील (Ind vs Ban T20 World cup 2022) सामन्यामध्ये भारताने 5 रन्सने विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर बांगलादेशचं पारडं जड झालं होतं. पावसामुळे भारत सामना गमावणार की काय अशी स्थिती होती. मात्र तसं झालं नेमकं उलट. पाऊस आला त्यानंतर बांगलादेशच्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या विकेट्स गेल्या आणि सामना भारताने जिंकत सेमी फायनलचं तिकीट पक्क केलं. मात्र यावेळी विराट, अर्शदीप आणि के.एल राहुलप्रमाणे टीम इंडियाच्या जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा होता तो रघूचा.
तुम्ही आजचा सामना पाहिला असेल तर तुम्ही बाऊंड्री लाईनच्या बाजूला रघूला पाहिलं असेल. कोण आहे नेमका हा रघू जाणून घेऊया.
रघू हा टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफपैकी एक आहे. रघू थ्रो डाऊनच्या माध्यमातून फलंदाजांना फलंदाजीची प्रॅक्टिस करवण्यास मदत करतात. त्यांचं अधिकतर काम हे नेट्समध्ये असतं. मात्र आज रघू एडिलेडच्या मैदानावर दिसून आला आणि खेळाडूंना कोचिंग देताना दिसला.
INDIA'S SIDEARM THROWER RAGHU IS RUNNING AROUND THE GROUND WITH A BRUSH TO CLEAN THE SHOES OF INDIAN PLAYERS TO AVOID THE POSSIBILITY OF THEM SLIPPING pic.twitter.com/GObnAEZNsE
— Aadi (@Aadi_16_) November 2, 2022
टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध लढताना रघू मैदानावर खेळाडूंची मदत करत होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात पाऊस आला आणि त्यामुळे बांगलादेशला केवळ 16 ओव्हर्समध्ये जिंकण्याची संधी मिळाली. पावसामुळे मैदान ओलं होतं आणि भारतीय खेळाडूंचे बूट मातीने माखले होते. ओल्या मातीमुळे खेळाडूंना घसरून दुखापत होऊ नये म्हणून रघूने त्याच्या ब्रशने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या बुटांची माती साफ करत होता. तर अशा पद्धतीने रघूने टीम इंडियाला जिंकण्यासाठी मदत केली.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "सामन्यात एक वेळ अशी होती की, मी शांत आणि चिंतेत होतो. एक गट म्हणून माझ्यासाठी शांत राहणं आणि योजनेला धरून राहणं महत्त्वाचं होतं. 10 विकेट्स हातात असताना, सामना दोन्ही टीम जिंकण्याची परिस्थिती होती. मात्र, ब्रेकनंतर आम्ही चांगली कामगिरी केली.
रोहित पुढे म्हणाला, बुमराहच्या अनुपस्थितीत कोणीतरी टीमसाठी जबाबदारी घ्यावी लागेल. एवढ्या तरुण खेळाडूसाठी अशी संधी मिळणं सोपं नाहीये. पण आम्ही अर्शदीपला त्यासाठी तयार केलंय. गेल्या 9 महिन्यांपासून तो यासाठी प्रयत्न करत होता. शमी आणि त्याच्यामध्ये एक पर्याय होता, परंतु आम्ही अशा व्यक्तीला पाठिंबा दिला ज्याने यापूर्वी आमच्यासाठी असं काम केलंय."