IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. डकवर्थ लुईसचा प्रभाव असूनही टीम इंडियाने या सामन्यात टीम इंडियाने अखेर बाजी मारली. आजच्या सामन्यातही विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याने नाबाद 64 आणि केएल राहुलच्या 50 रन्सच्या जोरावर 184 रन्स केले. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.
यानुसार बांगलादेश टीमला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 16 ओव्हरमध्ये 151 रन्सचं लक्ष्य मिळालं. बांगलादेशला केवळ 145 रन्स करता आल्या आणि 5 रन्सने सामना गमावला. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने 4 ओव्हरमध्ये 38 रन्स देत 2 विकेट्स घेतले. दरम्यान यावेळी अर्शदीपने शेवटची ओव्हर टाकून सामना जिंकून देत सर्वांची मनं जिंकली.
दरम्यान शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर मोहम्मद शमी असताना अर्शदीपला का दिली यावर अखेर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "सामन्यात एक वेळ अशी होती की, मी शांत आणि चिंतेत होतो. एक गट म्हणून माझ्यासाठी शांत राहणं आणि योजनेला धरून राहणं महत्त्वाचं होतं. 10 विकेट्स हातात असताना, सामना दोन्ही टीम जिंकण्याची परिस्थिती होती. मात्र, ब्रेकनंतर आम्ही चांगली कामगिरी केली.
रोहित पुढे म्हणाला, बुमराहच्या अनुपस्थितीत कोणीतरी टीमसाठी जबाबदारी घ्यावी लागेल. एवढ्या तरुण खेळाडूसाठी अशी संधी मिळणं सोपं नाहीये. पण आम्ही अर्शदीपला त्यासाठी तयार केलंय. गेल्या 9 महिन्यांपासून तो यासाठी प्रयत्न करत होता. शमी आणि त्याच्यामध्ये एक पर्याय होता, परंतु आम्ही अशा व्यक्तीला पाठिंबा दिला ज्याने यापूर्वी आमच्यासाठी असं काम केलंय."
ही फक्त काही इनिंग्सची गोष्ट होती. त्याला आशिया कपमध्ये संधी मिळाली आणि त्याने करून दाखवलं. आम्हाला कधीच शंका नव्हती आणि या वर्ल्डकपमध्ये तो ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ती जबरदस्त आहे. तो सध्याच्या घडीला टीमसाठी खरोखरच चांगला खेळतोय, असंही रोहितने सांगितलंय.