IND vs ENG second Test : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला 28 धावांनी धूळ चारली. अशातच आता 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी (IND vs ENG 2nd Test) टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. केएल राहुल (KLRahul) आणि रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार आहे. तर बीसीसीआयने तात्काळ बदली खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून टीम इंडियाची दारं ज्यासाठी बंद होती, अशा सरफराज खान (Sarfaraz Khan) याची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.
दुखापतीमुळे ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि फलंदाज केएल राहुल 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपासून खेळू शकत नाहीत, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. तर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार (Sourabh Kumar) या तीन खेळाडूंचा सुधारित संघात समावेश करण्यात आला आहे, असं ट्विट आयसीसीने केलं आहे. संघात नव्याने सामील केलेले तिन्ही खेळाडू 'इंडिया ए' संघाच्या इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेचा भाग होते.
सरफराज खान याला मागील तीन वर्षापासून टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. मात्र, त्याने हार मानली नाही. मेहनतीच्या जोरावर त्याने आता टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. इंग्लंड लायन्सविरुद्ध सरफराजने 160 चेंडूत 161 धावा केल्या होत्या. आणि सौरभ कुमारने दुसऱ्या डावात पाच बळी घेत टीम इंडियाला विजयाची चव चाखण्याची संधी दिली होती. त्यांच्या या दमदार खेळीमुळे बीसीसीआयने या तीन खेळाडूंना संघात सामील करून घेतलं आहे.
Two potential debutants in India’s revised squad for the second Test against England #WTC25 | #INDvENGhttps://t.co/RuYQgE6iMb
— ICC (@ICC) January 29, 2024
पाहा टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.
इंग्लंडचा संपूर्ण संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.