INDvsENG: अश्विन-पंड्याचा ‘मास्टर’ डान्स; कुलदीपची मिळाली साथ

वर्कआऊटदरम्यान अश्विन, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Updated: Feb 20, 2021, 12:05 PM IST
INDvsENG: अश्विन-पंड्याचा ‘मास्टर’ डान्स; कुलदीपची मिळाली साथ

मुंबई: भारत आणि इंग्लंड संघानं 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना आता अहमदाबाद इथे मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाचे खेळाडू वर्कआऊट करत आहेत. या वर्कआऊटदरम्यान अश्विन, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अश्विननं आपल्या इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मास्टर सिनेमातील म्युझिकवर हार्दिक, अश्विन आणि कुलदीप धमाल करत आहेत. या तिघांनी मिळून सुपर डान्स केला आहे. हे तिघंही जण जीममध्ये डान्स करताना दिसत आहेत. एकमेकांच्या साथीनं केलेल्या या डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwin (@rashwin99)

भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 24 फेब्रुवारीपासून हा सामना सुरू होणार आहे. हा सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळवला जाणार आहे.

दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनची खूप महत्वाची भूमिका होती.  अश्विननं या सामन्यात एकूण 8 गडी बाद केले. इतकच  नाही तर भारताच्या दुसऱ्या डावातही त्याने 106 धावांचे शानदार शतक झळकावले.