IPL Auction : Arjun Tendulkar निवडीवर शंका, बहीण Sara ने दिले सडेतोड उत्तर

अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांमध्ये खरेदी केली आणि...

Updated: Feb 19, 2021, 08:58 PM IST
IPL Auction : Arjun Tendulkar निवडीवर शंका, बहीण Sara ने दिले सडेतोड उत्तर
संग्रहित छाया

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या मोसमाच्या अगोदर गुरुवारी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव संपला. यावर्षीच्या लिलावात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, ज्यांना विक्री होण्याची काहीच आशा नव्हती. या खेळाडूंपैकी एक अर्जुन तेंडुलकर. (Arjun Tendulkar) दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा  अर्जुन तेंडुलकरचा लिलाव होणार की नाही, याबाबत अंदाज व्यक्त होत होते. मात्र, अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांमध्ये खरेदी केली. दरम्यान, ट्विटरवर अर्जुनच्या लिलावामुळे बरेच युजर्स नाराज दिसू लागले आणि त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आता आपल्या भावाच्या पाठिशी ठाम उभी राहिली आहे. तिने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Arjun च्या खरेदीनंतर Mumbai Indians ने दिले हे कारण?

ट्विटरवर ट्रेंड होतोय नेपोटिझम  

मुंबईने अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) आपल्या संघात समावेश केला. त्यानंतर ट्विटरवर नेपोटिझम (Nepotism) ट्रेंड होऊ लागला. लोक म्हणू लागले की नेपोटिझममुळे अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. अर्जुनबरोबर त्यांनी सचिन तेंडुलकरवरही खूप टीका केली.

अर्जुनला साराचा पाठिंबा  

Sara Tendulkar

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टीका करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. साराने भाऊ अर्जुनचे इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. हे करताना तिने लिहिले की, 'तुमच्याकडून ही कामगिरी कोणी काढून घेऊ शकत नाही, ती तुमची आहे. त्याने दुसर्‍या स्टोरीत लिहिले, 'मला तुझा अभिमान आहे'.

चाहत्यांकडून जोरदार समर्थन

मात्र, काही लोकांची नाराजी असूनही अर्जुनचे अनेक चाहते त्यांच्या समर्थनार्थ धाऊन आले आहेत. अर्जुन तेंडुलकर याच्या समर्थनार्थ अनेक चाहत्यांनीही ट्विट केले. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की अर्जुन स्वत:च्या मेहनतीने मुंबईच्या टीममध्ये सहभागी झाला आहे.