IND vs ENG: वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला डिच्चू

टीम इंडियाकडून कोणाला संधी कोणाला डिच्चू

Updated: Mar 19, 2021, 11:26 AM IST
IND vs ENG: वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला डिच्चू title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीवर असेल तर उपकर्णधारपदी रोहित शर्मा असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यानंतर टी 20चे चार सामने नुकतेच पार पडले आहेत भारत-इंग्लंड दोन्ही संघांनी बरोबरी साधली आहे. शेवटचा टी 20 सामना अद्याप बाकी आहे. याच चुरशीच्या लढतीदरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजसाठी टीम इंडियाकडून घोषणा करण्यात आली आहे. 

टीम इंडियाकडून कोणाला संधी कोणाला डिच्चू
विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उप कर्णधार) शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, एस यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), के. एल राहुल, युजवेंद्र चहल, के यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर , टी नटराजन, बी कुमार, मोहम्मद सिराज, पी कृष्णा, एस ठाकूर

देवदत्त पडिक्कल देखील संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याला संघात संधी देण्यात आली नाही. या सीरिजसाठी नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल अशी आशा होती. त्यापैकी फक्त कृणाल पंड्या आणि कृष्णाला संधी मिळाली आहे. ईशान किशनला मात्र संधी देण्यात आली नाही.

ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल यांना भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजसाठी संधी देण्यात आली नाही. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला वन डे सामना 23 मार्च रोजी होणार आहे. तर दुसरा सामना 26 मार्च आणि तिसरा सामना 28 मार्च रोजी होणार आहे.