मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. मालिकेवर विजय मिळाल्यानंतर विराट कोहलीनंतर त्याचा आनंद व्यक्त करत पुढचा प्लॅन सांगितला आहे. या नंतर भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज, IPL आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील त्याचं लक्ष्य ठरल्याचं कर्णधार विराटनं सांगितलं.
विराट कोहलीचं लक्ष्य आणि या विजयाचं रहस्य ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 3-2 ने विजय मिळवला. आधीच्या सामन्यातील चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेऊन कोहलीनं नियोजन केल्याचं पाहायला मिळालं. मालिकेवर भारतीय संघानं विजय मिळवला.
विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपमध्ये फलंदाजीसाठी ओपनिंग करणार आहे.' हिटमॅन रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली सुरुवातीला उतरतील असं नियोजन आहे. IPLमध्ये देखील ओपनिंगला मैदानात उतरेन' असंही विराटनं यावेळी सांगितलं.
'आपल्याकडे मिडल ऑर्डर फळी उत्तम तयार झाली आहे. टी 20 मध्ये आता आपल्याला सुरुवातीची फळी मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्याचा सराव व्हावा यासाठी IPLमध्ये देखील ओपनिंग करण्याचा विचार' असल्याचं कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी केलेल्या धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाला इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभं करता आलं.
कोहलीनं शानदार फलंदाजी करत 52 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. या दरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. कोहलीच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 224 धावा केल्या.