Ind vs Nz 1st odi: टीम इंडियाने न्यूझीलंडचा (team India) पहिल्या वनडेत 12 धावांनी पराभव करुन विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह तीन वनडेत सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयी सलामीचा शुभमन गिल (Shubman Gill) हा प्रमुख शिल्पकार ठरला आहे. त्याने 149 चेंडूत 208 धावांची वादळी खेळी खेळला आहे. पण टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ज्या पद्धतीने आऊट झाला तो चर्चेचा विषय राहिला. कारण टीम इंडियाला (team India) पाचवा मोठा धक्का हार्दिक पांड्याच्या रुपाने बसला आहे. हार्दिक पांड्या 38 चेंडूत 28 धावा करत लॉकी डॅरिल मिशेलचा बळी ठरला. ज्यामध्ये थर्ड अंपायरच्या (Third Umpire) निर्णयावर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कारण यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर थर्ड अंपायरच क्लास घेतला.
संघाची धावसंख्या 175 असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 26 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. डेरिल मिशेलच्या (Daryl Mitchell) गोलंदाजीवर मिशेच सँटनेरनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर उतरलेल्या हार्दिक पांड्याने साजेशी खेळी सुरु केली. त्यानंतर डेरिल मिशेलच्या 38 चेंडूत 28 धावांवर असताना हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बाद झाला.
Unlucky Hardik Pandya. pic.twitter.com/ALqYj9R0Bg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 18, 2023
मिशेलच्या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम समोरून विकेटकीपिंग करत होता. मिशेलचा चेंडू लॅथमच्या ग्लोव्हजमध्ये गेला त्याचवेळी बेल्सही पडल्या. मैदानातील पंचांना हा निर्णय किचकट वाटत असल्याने त्यांनी याबाबतची दाद तिसऱ्या पंचांकडे मागितली. मात्र तिसऱ्या पंचांनी त्रिफळाचीत घोषित केल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं.
Wrong decision by Third Umpire, he should have take some more time to take judge the result. pic.twitter.com/woTzuUhroJ
— Naveen singh kushwaha (@Naveenskushwaha) January 18, 2023
Ye vala camera angle third umpire ko kyu nhi btaya? #NZvsIND #HardikPandya pic.twitter.com/9sgfGqVA6r
— Sourabh 08 (@Sourabh086) January 18, 2023
Konsa nasha kr rkha hain 3rd umpire ne #CricketTwitter #HardikPandya pic.twitter.com/BuUTF18pts
— Mandeep Singh Dahiya (@dahiyamandeep18) January 18, 2023
Out or Not Out?#IndvNz#HardikPandya #notout pic.twitter.com/Hbzzwan4bs
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) January 18, 2023
यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांनी हार्दिक आऊट झाल्याने अनेक व्हिडीओ आणि फोटो अपलोड शेअर केले. ज्यामध्ये हार्दिक पांड्याला थर्ड अंपायरने आऊट दिलचं कसं? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.