IND vs NZ 2nd Test | टीम इंडियाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडची घसरगुंडी, पहिला डाव 62 धावांवर आटोपला

टीम इंडियाने पहिल्या डावात केलेल्या 325 धावांच्या प्रत्युतरात न्यूझीलंडचा पहिला डाव 62 डावांवर आटोपला आहे. 

Updated: Dec 4, 2021, 04:02 PM IST
IND vs NZ 2nd Test | टीम इंडियाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडची घसरगुंडी, पहिला डाव 62 धावांवर आटोपला  title=

मुंबई : टीम इंडियाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 62 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात केलेल्या 325 धावांच्या प्रत्युतरात न्यूझीलंडचा पहिला डाव 62 डावांवर आटोपला आहे. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. विशेष म्हणजे 2 फलंदाजांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. (Ind vs nz 2nd test 2 day new Zealand all out for 62 runs in 1st innings ravichandran ashwin mohammed siraj  shine at wankhede stadium mumbai)

न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक 17 धावा केल्या. तर टॉम लॅथमने 10 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अक्षर पटेलने 2 तर जयंत यादवने 1 विकेट घेत अश्विन आणि सिराजला चांगली साथ दिली आहे. 

टीम इंडियाने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. त्यानंतर किवींना 62 धावांवर गुंडाळल्याने टीम इंडियाला 263 धावांची आघाडी मिळाली आहे.

न्यूझीलंडची भारतातील निच्चांकी धावसंख्या 

न्यूझीलंडने 62 धावांवर ऑलआऊट झाल्याने त्यांच्या नावे भारतात कसोटीत निच्चांकी धावसंख्येची नोंद झाली आहे. याआधी न्यूझीलंडने 1987 साली टीम इंडिया विरुद्ध दिल्लीमध्ये एका डावात 75 धावा केल्या होत्या.  

टीम इंडियाच्या पहिल्या डावात 325 धावा

दरम्यान एजाज पटेलच्या फिरकीसमोर टीम इंडियाचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मयांक अग्रवालने सर्वाधिक 150 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान यानंतर पहिल्या डावात खेळायला आलेल्या न्यूझीलंडचा डाव गडगडला.न्यूझीलंडने चहापानापर्यंत 16.4 ओव्हरमध्ये 38 धावा करुन 6 विकेट्स गमावल्या. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज. 

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग,  डॅरेल मिचेल, रॉस टेलर, हेनरी निकोलस, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचीन रवींद्र, कायले जेमीन्सन, टीम साऊथी, विल्यम सोमरविल आणि अझाज पटेल.