IND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं

Hamstring injury to Shubman Gill : शुभमन गिलला मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...

सौरभ तळेकर | Updated: Nov 15, 2023, 09:20 PM IST
IND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं title=
hamstring injury happened to Shubhman gill

World Cup 2023 Semifinal : टीम इंडियाने आज फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा यांनी दमदार खेळी करून किंवीने प्रेशरमध्ये आणलं तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या नांग्या ठेचल्या. या सामन्यात शुभमन गिलचं शतक हुकलं. शुभमन गिल 79 धावांवर असताना त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring injury to Shubman Gill) समस्येला सामोरं जावं लागलं. त्याच्यावर मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...

हॅमस्ट्रिंग म्हणजे काय ?

हॅमस्ट्रिंग (Hamstring Muscle) हे स्नायूचं नाव असून, हिप्सपासून गुडघ्यांपर्यंतच्या भागात जांघांच्या पाठीमागे असलेला हा स्नायू आहे. खेळाडू सातत्याने धावत असल्याने त्या स्नायूवर ताण येतो आणि दुखापत होते. मस्ट्रिंगच्या स्नायूंमध्ये अचानक ताण येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला धावणे, चालणे किंवा चढण्यात अडचण येऊ शकते. अशा प्रकारची दुखापत खेळाडूंमध्ये अनेकदा दिसून येते. मांडीच्या मागच्या बाजूला तीन हॅमस्ट्रिंग स्नायू असतात. जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा स्क्वॅट करता तेव्हा या स्नायूंवर सर्वाधिक ताण येतो. हे स्नायू म्हणजे बायसेप्स फेमोरिस, सेमीमेम्ब्रानोसस आणि सेमीटेन्डिनोसस स्नायू असे स्नायू असतात.

दरम्यान, शरीराला आराम देणं हा या दुखापतीतून बरं होण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. RICE (Rest, Ice, Compression & Elevation) थेरपीच्या साह्याने यावर उपचार केले जातात. त्यात शरीराला आराम देणं, बर्फाने शेकणं आणि फिजिओथेरपीच्या साह्याने शरीराच्या त्या भागाच्या हालचाली घडवून आणणं आदींचा समावेश असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.