मुंबई : भारताचा विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. दरम्यान एका मुलाखतीत दिनेश कार्तिकने महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं विधान केले आहे.
दिनेश कार्तिकने रविवारी बीसीसीआयशी मजेदार संवाद केला. या संवादा दरम्यान कार्तिकने अनेक प्रश्नांवर उत्तर दिली. कार्तिक म्हणाला, 'माझ्यात उडण्याची क्षमता असती तर मी अलास्काला उड्डाण केले असते. मी अलास्का बद्दल छान गोष्टी ऐकल्या आहेत.
जर मला एखाद्याच्या डोक्यात काय चाललंय हे वाचण्याची क्षमता दिली असती तर मी एमएस धोनीच्या डोक्यात काय चाललंय हे वाचण्याचा प्रयत्न केला असता.
दिनेश कार्तिकने पुढे कॉफीऐवजी चहा निवडला आणि सांगितले की, तो जेव्हाही तामिळनाडूच्या बाहेर जातो तेव्हा त्याला चहा पिण्याची भरपूर संधी मिळते.
रॉजर फेडरर आणि राफेल नदालमध्ये कार्तिकने रॉजर फेडररची निवड केली. क्रिस्टियानो रोनाल्डोपेक्षा त्याला मेस्सीला पाहणे जास्त आवडते असेही कार्तिकने सांगितले. कार्तिक म्हणाला, 'मला वाटते की मेस्सी थोडा वेगळा आहे आणि मी जे पाहिले आहे ते पाहण्यात मला आनंद आहे.
आयपीएल कामगिरी
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या मोसमात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने चमकदार कामगिरी केली. कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी फिनिशरची भूमिका बजावत 183.33 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिनेश कार्तिकचे प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.