गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20I) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचा पिच रिपोर्ट (Pitch Report) आणि हवामान अंदाज (Weather Report)काय सांगतो, ते जाणून घेऊयात.
पिच रिपोर्ट काय सांगतो?
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट (Barsapara Stadium) स्टेडियमवर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (IND vs SA 2nd T20I) आमने सामने येणार आहेत. या मैदानावर आतापर्यंत फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना पूर्ण झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ (भारत) अवघ्या 118 धावांत सर्वबाद झाला होता. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 16व्या ओव्हरमध्ये हा सामना जिंकला होता.
दरम्यान हा सामना टॉसवर अवलंबून असणार आहे. प्रथम बॅटींग करणारा संघ जास्त धावा करू शकला नाही आहे. त्यामुळे निश्चितच टॉस जिंकणारा संघ प्रथम बॉलिंग घेईल आणि नंतर धावांचा पाठलाग करेल. त्यामुळे टॉसवर हा सामना अवलंबून असणार आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणतात की, खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. म्हणजेच येथे गोलंदाज आणि फलंदाजांना समान मदत मिळू शकते.
हवामानाचा अंदाज काय?
गुवाहाटीमध्ये चांगला उन्हाळा दिसत आहे. दुपारी तापमान 36 अंशांवर पोहोचत आहे. मात्र, आज सायंकाळी येथे पावसाची शक्यता आहे. अगदी कमी षटकांचा सामना पाहणे क्रिकेट चाहत्यांना नशिबात असण्याची शक्यता आहे.
या मालिकतील पहिला सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने आजचा सामना 'करो या मरो'चा सामना असणार आहे. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी साधता येणार आहे. यासह जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर मालिका त्यांच्या खिशात असेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20I) यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता.
संभाव्य संघ
टीम इंडिया प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग-11 : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रोसू, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्सिया, तबरीझ शम्सी.