अजिंक्य रहाणेच्या करियरला लागणार ब्रेक? शेवटची संधीही गमवली

अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो कायम, नेटीझन्सकडून रहाणेला सेंडऑफ 

Updated: Jan 13, 2022, 03:18 PM IST
अजिंक्य रहाणेच्या करियरला लागणार ब्रेक? शेवटची संधीही गमवली title=

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना टीम इंडियासाठी जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने आतापर्यंत कसोटी सीरिजमध्ये बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकला तर टीम इंडियाचं वर्चस्व सीरिजवर राहील अन्यथा पराभवाचा सामना करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य राहाणे खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. असं असलं तरी देखील त्याला दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटची संधी दिली जाणार अशी चर्चा होती. या सीरिजमध्ये रहाणेला त्याची उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी होती. मात्र पुन्हा एकदा रहाणेच्या पदरात अपयश आलं आहे. 

अजिंक्य रहाणेकडून उपकर्णधारपदाही काढून घेण्यात आलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेनं केवळ एक धावा काढून बाद झाला आहे. 9 बॉलमध्ये त्याने एक रन काढला आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि चाहते देखील रहाणेवर खूप जास्त नाराज आहेत. 

सोशल मीडियावर देखील पुजारा आणि रहाणेची खिल्ली उडवली जात आहे. गेल्या वर्षभरात दोघंही खराब फॉर्ममध्ये खेळत असल्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे.