India vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान

श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? 

Updated: Sep 6, 2022, 09:31 PM IST
India vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान title=

यूएई : टीम इंडियाचा (team india) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 173 धावसंख्या गाठली आहे. त्यामुळे (IND vs SL) श्रीलंकेसमोर 174 धावांचे आव्हान असणार आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत कोण स्थान मिळवतो, याकडे आता क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.  

श्रीलंकेने  (Sri Lanka)  टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया (team india) प्रथम फलंदाजीस उतरली होती. मात्र टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. केएल राहूल 6 रन्सवर आऊट झाला. त्याच्यानंतर उतरलेला विराट कोहली शुन्यावर आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवने टीमची बॅटींग सावरली. सुर्यकुमार यादव 29 बॉलमध्ये 34 रन्स करून आऊट झाला. तर रोहित शर्माने 41 बॉलमध्ये 72 धावा ठोकत आऊट झाला. या खेळीत त्याने 5 फोर आणि 4 सिक्स मारले. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत 17 धावांवर आऊट झाले. दिपक हुड़्डा 3 वर आऊट झाला. या रन्सच्या बळावर टीम इंडियाने 173 रन्स केले आहेत. 

दरम्यान आता श्रीलंकेसमोर 174 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान श्रीलंका पुर्ण करते की टीम इंडियाचे बॉलर्स त्यांना रोखतात,याकडे आता क्रिकेट फॅन्सचे लक्ष आहे.