मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याच दरम्यान दुसरीकडे श्रीलंके विरुद्ध टीम इंडिया जुलैमध्ये लिमिटेड ओव्हर्समध्ये सामने होणार आहे. या सामन्यांसाठी ज्युनियर्सची टीम असणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा नसतील असंही सांगण्यात आलं आहे.
गेल्यावर्षी देखील श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया सामने होणार होते मात्र कोरोना व्हायरसमुळे रद्द करावे लागले. यंदा या सामन्यांचं नियोजन कऱण्यात आलं आहे. BCCIच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया 3 टी -20 आणि 3 वन डे सीरिज खेळणार आहे.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 13,16 आणि 19 जुलै रोजी भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सीरिज खेळली जाणार आहे. 22 ते 27 जुलै दरम्यान टी 20 सीरिज आयोजित करण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार 5 जुलैला टीम इंडियाच्या खेळाडूंना श्रीलंकेमध्ये जावं लागणार आहे. तर 28 जुलैला खेळाडू भारतात परतणार आहेत.
युवा खेळाडूंना असणार टीम इंडियात संधी
पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यासरख्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.