IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध 'या' 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष

IND vs ZIM T20 World Cup: टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकतो.  त्यामुळे या दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 6, 2022, 09:26 AM IST
IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध 'या' 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष title=

India vs Zimbabwe ICC T20 World Cup 2022 Live Updates: T20 विश्वचषकात आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) महत्वाचा आहे. कारण या सामन्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे दोन खेळाडूंवर टीममध्ये परतण्याबाबत टांगती तलवाल आहे. टीम इंडियाकडून खेळताना दोन खेळाडू अतिशय खराब कामगिरी करत आहेत. हे खेळाडू भारतीय संघासाठी मोठे ओझे बनले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज मेलबर्नच्या मैदानावर 'करो या मरो'चा सामना होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याबाबत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. अशा परिस्थितीत तो खराब फॉर्ममध्ये खेळणाऱ्या दोन खेळाडूंची सुट्टी करु शकतो.  

या फिरकीपटूने केले निराश, याला मिळणार संधी?

T20 विश्वचषक 2022 मध्ये रविचंद्रन अश्विन यांची फारशी जादू चाललेली नाही. तो चांगला खेळ दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. टीम इंडियासाठी तो सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे. त्‍याने टी-20 विश्‍वचषकाच्‍या चार सामन्‍यात केवळ 3 विकेट घेतल्या आहेत. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी फायदेशीर ठरत असेल, पण टी-20 क्रिकेटमध्ये त्याची जादू चालत नाही, असेच दिसून येत असून तो चांगलाच महागात पडला आहे. 

आर अश्विनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) अनेक धावा दिल्या होत्या, त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. रविचंद्रन अश्विनने भारतीय संघासाठी 63 टी-20 सामन्यात 69 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत झिम्बाब्वेविरुद्ध अश्विनच्या जागी युझवेंद्र चहल याचा समावेश केला जाऊ शकतो. 

हा यष्टीरक्षक फ्लॉप ठरतोय 

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सर्वोत्तम खेळ दाखवून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करणारा दिनेश कार्तिक  (Dinesh Karthik) टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपला फिनिशर फॉर्म दाखवू शकलेला नाही. त्याच्यामुळे स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला पॅव्हेलियनमध्येच बसावे लागले आहे. जेव्हा-जेव्हा दिनेश कार्तिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा असते, त्यावेळी तो टीम इंडियासाठी योगदान देऊ शकलेला नाही. तो रिकाम्या हाताने पॅव्हेलियनमध्ये परतला. 

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 2022च्या T20 विश्वचषक स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. आता तो 37 वर्षांचा आहे. त्याच्या वयाचा परिणाम त्याच्या फॉर्मवरही दिसून येत आहे. त्याने टीम इंडियासाठी 60 टी-20 सामन्यात 686 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याऐवजी कर्णधार रोहित झिम्बाब्वेविरुद्ध  सामन्यात ऋषभ पंत याला संधी देऊ शकतो. 

झिम्बाब्वे विरुद्ध विजय महत्वाचा

टी-20 विश्वचषकात 4 सामन्यांत 3 विजयांसह टीम इंडिया (Team India) सध्या 6 गुणांसह ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवून भारतीय संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरु शकतो. पण टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे खुले होतील. त्यामुळे भारताला या सामना गमविणे खूपच महागात पडेल.