IND vs ZIM: टीम इंडियाच्या पराभवासाठी पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात,झिंबाब्वेला दिली खुली ऑफऱ

'टीम इंडियाचा पराभव करा, मी झिंबाब्वेच्या तरूणाशी लग्न करेन', पाकिस्तानी अभिनेत्रीची झिंबाब्वेला संघाला ऑफर 

Updated: Nov 3, 2022, 10:11 PM IST
 IND vs ZIM: टीम इंडियाच्या पराभवासाठी पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात,झिंबाब्वेला दिली खुली ऑफऱ title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) टीम इंडियाचं स्थान सेमी फायनलमध्ये निश्चित मानलं जात आहे. फक्त झिंबाब्वे संघाविरूद्ध एक औपचारीक सामना बाकी आहे. या सामन्यापुर्वीच पाकिस्तानी अभिनेत्रीने टीम इंडिया (Team India) विरूद्ध एक ट्विट केलं आहे. या तिच्या ट्विटची क्रिकेट विश्वासह, बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे. 

हे ही वाचा : पाकिस्तानच्या विजयाने भारताच टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे...

काय ट्विट केले आहे? 

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने (sehar shinwari) टीम इंडियाच्या (Team India) आगामी झिंबाब्वे (zimbabwean) टी-20 सामन्याबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, झिम्बाब्वेने भारताला 'चमत्काराने' हरवले तर ती झिंबाब्वेच्या माणसाशी लग्न करेल. अशा आशयाचं ट्विट करत तिने झिंबाब्वे संघाला खुली ऑफर दिली आहे. या तिच्या ट्विटची खुप चर्चा रंगली आहे.  

कधी आहे सामना?

टीम इंडियाचा (Team India) पुढील सामना झिंबाब्वे (zimbabwean) विरूद्ध 6 नोव्हेंबरला असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया सेमी फायनलच तिकीट आणखीण कन्फर्म कऱणार आहे. मात्र या सामन्यापुर्वी सेहर शिनवारीने ट्विट करून लिहिले की, 'पुढील सामन्यात झिंबाब्वेच्या टीमने भारताला चमत्कारिकरित्या हरवले तर मी झिंबाब्वेच्या मुलाशी लग्न करेन. तिच्या या ट्विटला 850 हून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केले आहे आणि त्याला आतापर्यंत 49 री ट्विट्स मिळाले आहेत.

अभिनेत्री होतेय ट्रोल

या ट्विटनंतर सेहर शिनवारीने (sehar shinwari) क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आली आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीला क्रिकेट चाहते सतत ट्रोल करत आहेत. एका युजरने ट्विट केले की, 'मग मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे, कारण तू आयुष्यभर एकटी राहणार आहेस.' दुसऱ्याने लिहिले, 'भारताने बांगलादेशला हरवल्यावर तुम्ही तुमचे ट्विटर अकाउंट डिलीट करायला हवे होते, असे लिहले आहे. 

दरम्यान आता 6 नोव्हेंबरच्या सामन्यात टीम इंडिया (team india) झिंबाब्वेचा पराभव करतो की, झिंबाब्वे टीम इंडियाचा हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.