India vs Netherlands : वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडचा दारुण पराभव केला आहे. श्रेयस अय्यर आणि के एल राहुलच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेदरलँडला 411 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर फिक्क्या पडलेल्या नेदरलँड संघाला आव्हान पेलता आलं नाही. नेदरलँडचा 160 धावांनी पराभव झालाय. त्यामुळे आता टीम इंडियाने नेदरलँडचा पराभव करून जोरात दिवाळी साजरी केली आहे. साखळी सामन्याचा द एन्ड झाल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची खरी परीक्षा असणार आहे.
टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला. वेस्ली बॅरेसी आणि मॅक्स ओडोड यांना चांगली सुरूवात मिळाली नाही. सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने काहीवेळ टीम इंडियाला प्रेशरमध्ये आणलं होतं. मात्र, दुसऱ्या बाजूने स्पिनर्सने विकेट खोलल्या. त्यानंतर तेजा निदामनुरु याने झुंज दिली. मात्र, भारताच्या टार्गेटवर नेदरलँडची टीम पोहचू शकली नाही. टीम इंडियाकडून बुमराह, शमी, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर विराट कोहलीच्या खात्यात एक विकेट आली. तर कॅप्टन रोहितने देखील एक गडी बाद केलाय. आजच्या सामन्यात विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी देखील गोलंदाजी केली.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय रोहित शर्माने घेतला होता. फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक ठोकली.100 वर भारताची पहिली विकेट गेली. मात्र, किंग कोहली आपला जलवा दाखवला अन् फिफ्टी पूर्ण केली. मात्र, त्याला ऐतिहासिक कामगिरी करता आली नाही. त्याचं 50 वं शतक हुकलं. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी सुट्टी दिली नाही. दोन्ही खेळाडूंनी वादळी शतक ठोकलं. श्रेयसने 94 बॉलमध्ये 128 धावांची खेळी केली तर केएल राहुलने 64 बॉलमध्ये 102 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 410 धावा उभ्या केल्या.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.