आफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Updated: Jun 11, 2017, 09:26 PM IST
आफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये title=

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. १९२ रन्सचा पाठलाग करताना शिखर धवनच्या ७८ रन्स आणि विराट कोहलीच्या ७६ रन्समुळे भारतानं आफ्रिकेला ८ विकेटनी हरवलं आहे.

त्याआधी टॉस जिंकून भारतानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं. भारताच्या बॉलर्सबरोबरच क्षेत्ररक्षकांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या मॅचमध्ये आफ्रिकेचे तीन बॅट्समन रन आऊट झाले. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अश्विन, पांड्या आणि जडेजाला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये मिळालेल्या विजयामुळे आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. 

शिखर धवननं तोडलं सचिन-सौरवचं रेकॉर्ड

शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं १९वं अर्धशतक केलं आहे. याचबरोबर या मॅचमध्ये धवननं सचिन आणि सौरव गांगुलीचं रेकॉर्ड तोडलं आहे. ​

आयसीसी टूर्नामेंट्समध्ये सर्वात जलद एक हजार रन्स बनवण्याचं रेकॉर्ड धवननं केलं आहे. आयसीसी टूर्नामेंट्समध्ये एक हजार रन बनवायला धवनला १६ इनिंग लागल्या. हेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरनं १८ इनिंगमध्ये आणि सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉनं २० इनिंगमध्ये केलं होतं.

याचबरोबर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त ५० रन्स बनवण्याच्या रेकॉर्डचीही धवननं बरोबरी केली आहे. धवननं आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं झळकवली आहेत. राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीनंही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं केली आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x