IND VS ENG: कोहलीला राग अनावर, भडकला थर्ड अंपायरवर

'मी थर्ड अंपायर असतो तर...' बेन स्टोक्सच्या रन आऊट न देण्यावर भडकला कोहली

Updated: Mar 27, 2021, 01:01 PM IST
IND VS ENG: कोहलीला राग अनावर, भडकला थर्ड अंपायरवर

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन डे सामना नुकताच पुण्यात पार पडला. या सामन्या इंग्लंड संघानं सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या वन डे सामन्यादरम्यान अंपायरनं दिलेल्या निर्णयबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतकच नाही तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील संतापला होता. 

दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? 
इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान 26 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर फलंदाजी केली. त्यावेळी कुलदीप यादव फिल्डिंग करत होता. स्टोक्स धावा काढण्यात व्यस्त असताना त्याला रन आऊट करण्यात आलं. मात्र अंपायरनं रन आऊटचा निर्णय न देता खेळ पुढे सुरू ठेवण्यास सांगितला. 

स्टोक्स रन आऊट झाल्याचा दावा करण्यात आला. टीव्ही रीप्लेमध्ये स्टोक्सच्या बॅटचा कोणताही भाग क्रीजच्या आत दिसत नव्हता. त्याने बाहेर पाहिले. थर्ड अंपायरनंही स्टोक्सला आऊट दिलं नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील संतापला होता. सोशल मीडियावर या घटनेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

थर्ड अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली नाराज झाला. त्याने तिथे अंपायरसोबत काही मिनिटं वादही घातला. त्यावेळी आकाश चोपडा आणि इरफान पठान यांनी देखील ही घटना पाहून स्टोक्स आऊट असल्याचा दावा केला. इतकच नाही तर युवराज सिंह आणि इंग्लंडचा पूर्व कर्णधार माइकल वॉननं देखील ट्वीट करून बेन स्टोक्स आऊट असल्याचं सांगितलं. मात्र थर्ड अंपायरनं आऊट न दिल्यामुळे मैदानात टीम इंडियात काहीसं नाराजी आणि संतापाचं वातावरण होतं.