लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळला जात आहे. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) पार पडत आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी Ball Tampering करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार कोणत्या खेळाडूंनी केलाय, हे व्हायरल होत असलेल्या व्हीडिओतून स्पष्ट होऊ शकत नाहीये. मात्र इंग्लंडकडून करण्यात आलेल्या या कृतीचा विरोध केला जात आहे. चेंडू स्विंग व्हावा यासाठी बॉल टेम्परिंग केलं जातं. (India vs England 2nd Test day 4 Mark Wood and Rory Burns spark ball tampering debate amid Lord's Test)
स्टुअर्ट ब्रॉर्डकडून बचावाचा प्रयत्न
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ट्विट करत याबाबतचा खुलासा करताना या खेळाडूंचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय. "या व्हीडिओत असलेले हे दोन्ही खेळाडू हे मार्क वूड आणि रॉरी बर्न्स आहेत, असं ब्रॉर्ड म्हणाला. ब्रॉर्ड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाल्याने तो समालोचन करत आहे. यावेळेस ब्रॉर्ड बोलत होता.
मार्क आणि रॉरी त्यांच्या पायाखाली आलेला चेंडू दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यात ते अयशस्वी झाले. हे सर्व अपघाताने झालं. तसेच हा अर्धवट व्हीडिओ शेअर केला जातोय. मोजकेच स्क्रीनशॉट दाखवण्याऐवजी संपूर्ण व्हीडिओ दाखवला जावा, असं ब्रॉडने स्पष्ट केलं. या सर्व प्रकरणावरुन नेटीझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
दरम्यान काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने चेंडूशी छेडछाड केली होती. ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली होती. चेंडू कुरतडल्याने या दोघांवर कारवाईचा बडगा उठवण्यात आला होता. त्यामुळे आता सामनाधिकारी आणि पंच व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओची चौकशी करुन योग्य कारवाई करणार का, याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.
Ball Tampering Video #INDvENG #IndvsEng #ENGvIND #ENGvsIND #BallTempering #IndiaAt75 pic.twitter.com/zogDtOg5xq
— GurPreet ChAudhary (@GuriChaudhary77) August 15, 2021
India vs England 2nd Test | इंग्लंडचा चिडखोरपणा, खेळाडूंकडून Ball Tamperingचा प्रयत्न? भारतीय चाहते संतापले