Umesh Yadav | उमेश यादवची जबरदस्त कामगिरी, विक्रमाला गवसणी, ठरला सहावा भारतीय गोलंदाज

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी (india vs england 4th test day 2) उमेश यादवने (Umesh Yadav) विक्रमी कामगिरी केली आहे.

Updated: Sep 3, 2021, 04:46 PM IST
Umesh Yadav  | उमेश यादवची जबरदस्त कामगिरी, विक्रमाला गवसणी, ठरला सहावा भारतीय गोलंदाज title=

लंडन : टीम इंडियाची चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाची (india vs england 4th test day 2) झोकात सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून इंग्लंडला दणके द्यायला सुरुवात केली. उमेशने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतरच्या सातव्या मिनिटाला टीम इंडियाला दुसऱ्या दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली. उमेशने नाईट वॉचमॅन असलेल्या क्रेग ओव्हरटनला (Craig Overton) आऊट केलं. यासह उमेशने अनोखा विक्रम केला. उमेश असा कारनामा करणारा सहावा वेगवान गोलंदाज ठरला. (india vs england 4th test day 2 Umesh Yadav become sixsth quickest Indian pacers who get 150 wickets at kennington oval london)

नक्की विक्रम काय? 

इंग्लंडने  दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 3 बाद  53 धावांपासून सुरुवात केली. उमेश इंग्लंडच्या पहिल्या डावातील 19 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर उमेशने क्रेगला कर्णधार विराट कोहलीच्या हाती कॅच आऊट केलं. यासह उमेश कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून कमी डावात 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा सहावा वेगवान गोलंदाज ठरला.  याआधी टीम इंडियाकडून 5 गोलंदाजांनी हा कारनामा केलाय.

कमी डावात 150 विकेट्स घेणारे भारतीय

कपिल देव : 67
जवागल श्रीनाथ : 72
मोहम्मद शमी : 80
झहीर खान :  89
ईशांत शर्मा : 94 
उमेश यादव : 95*

उमेश यादवने या 150 विकेट्सपैकी 96 विकेट्स या भारतात खेळताना घेतल्या आहेत. तर उर्वरित 54 विकेट्स या परदेशात घेतल्या आहेत. दरम्यान उमेशने क्रेगला बाद केल्यानंतर डेव्हीड मलानलाही आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. उमेशने डेव्हीडला 31 धावांवर रोहित शर्माच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.