भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु होतोय.

Updated: Nov 7, 2017, 06:46 PM IST
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

तिरुअनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु होतोय.

सामन्यावर पावसाचे सावट होतेच. तब्बल ३० वर्षांनी येथे सामना होतोय. १९८८मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर आजचा सामना होतोय. मात्र पावसाने व्यत्यय आणल्याने टॉसही होऊ शकलेला नाहीये.

आजचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. 

तर या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी निराशा केली. फलंदाजीत आजी-माजी कर्णधारांनी चांगला खेळ केला. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजाची कामगिरी चांगली होणे महत्त्वाचे आहे.