प्रत्येक Boundary नंतर रावणाच्या लंकेत श्री रामाचा जयजयकार! Ind vs Pak सामन्यातील Videos

India Vs Pakistan Asia Cup 2023 Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तुम्ही हे मीस तर केलं नाहीत ना?

Updated: Sep 3, 2023, 12:04 PM IST
प्रत्येक Boundary नंतर रावणाच्या लंकेत श्री रामाचा जयजयकार! Ind vs Pak सामन्यातील Videos title=
सोशल मीडियावर व्हायरल झाले अनेक व्हिडीओ

India Vs Pakistan Asia Cup 2023 Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आशिया चषक स्पर्धेमध्ये शनिवारी झालेला सामना पावसात वाहून गेला. श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानावर झालेल्या सामन्यातील पहिलाच डाव खेळवण्यात आला. त्यानंतर सातत्याने पाऊस पडत असल्याने दुसऱ्या डावामध्ये एका षटकाचाही खेळ झाला नाही. त्यामुळेच साखळीफेरीसाठी राखीव दिवस नसल्याने सामना रद्द करावा लागला. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून देण्यात आला. मात्र या सामन्यामध्ये जेवढा खेळ झाला त्यादरम्यान अनेक रंजक किस्से घडले. केवळ मैदानातच नाही मैदानाबाहेरील अनेक घडामोडींसंदर्भात सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. अशीच एक चर्चा सुरु आहे मैदानात वाजणाऱ्या गाण्यांसंदर्भात.

66 वर 4 बाद

हल्ली सामान्यपणे क्रिकेटच्या मैदानामध्ये चौकार किंवा षटकार लगावण्यात आल्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं म्हणून स्पीकर्सवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. क्रिकेटचं सर्वत लघू स्वरुप असलेल्या टी-20 स्पर्धांमध्ये घडणारी ही गोष्ट आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळते. असाच काहीसा प्रकार शनिवारी घडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र शाहीन शाह आफ्रिदी आणि नंतर हारिस रौफच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय सलामीवीरांना नांगी टाकली. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गील हे चौघे संघाची धावसंख्या 66 वर असतानाच तंबूत परतले. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्या आणि इशान किशनने सुंदर फटकेबाजी करत 138 धावांची पार्टनरशीप केली. याच पार्टरनशीपच्या जोरावर भारताने 266 धावांपर्यंत मजल मारली.

1)

प्रत्येक चौकार-षटकार मारल्यानंतर...

या सामन्यादरम्यान जेव्हा जेव्हा भारतीय फलंदाज चौकार किंवा षटकार लगावत होते तेव्हा तेव्हा मैदानावरील स्पीकर्सवर गाणी लागत होती. यापैकी बहुतांश गाणी हिंदीच होती. मात्र अनेकदा पाकिस्तानी गोलंदाजांचा चेंडू हार्दिक आणि इशानने सीमेपार धाडला की 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये प्रभू श्री रामांचा जयघोष करणारं राम सिया राम हे गाणं लागायचं. अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. काहींनी तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आणि ते ही थेट श्रीलंकेत हे गाणं वाजवत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी भारत आणि पाकिस्तानचा सामना श्रीलंकेत सुरु असताना या यजनाम देशाचा उल्लेख रावणाची भूमी असा करत रावणाच्या भूमीत भगवान श्री रामाचा जयजय कार होत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तान 'सुपर-4'मध्ये

दरम्यान, हा सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाल्याने पाहिल्या सामन्यात नेपाळला 200 हून अधिक धावांनी धूळ चारणारा पाकिस्तान 'सुपर-4'साठी पात्र ठरणारा पहिला संघ झाला. भारताला आता नेपाळला पराभूत करावं लागणार आहे.