IND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video

IND vs PAK, SAFF Championship:  टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत.  

Updated: Jun 21, 2023, 10:12 PM IST
IND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video title=
India Vs Pakistan Fight Video:

India Vs Pakistan Fight Video: भारत आणि पाकिस्तान म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी. दोन्ही देशात सामना असता की वाद होणार हे पक्कं असतं. अशातच सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप  (SAFF Championship) स्पर्धेत झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडू भिडल्याचं दिसून आलं आहे. हायहोल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) 4-0 ने पराभव केला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत. 

इगोर स्टिमॅक यांनी पाकिस्ताचा मिडफिल्डर खेळाडू अब्दुल्ला इकबाल (Abdullah Iqbal) याच्याकडून फुटबॉल हिसकावून घेतला. त्यावेळी रहीस नबीसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून येतंय. त्यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू आमने सामने आले आणि धक्काबुक्की झाल्याचं दिसून येत आहे. सुनील छेत्री याने मध्यस्ती करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या वादाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय. दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर रेफ्रींनी स्टिमॅकला लाल कार्ड आणि पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाला पिवळे कार्ड देण्याचा निर्णय घेतला.

पाहा Video

कर्णधार सुनील छेत्रीने अप्रतिम कामगिरी करताना भारतासाठी हॅट्ट्रिक गोल (Sunil Chhetri Hat trick) केले. छेत्रीने तीनपैकी दोन गोल पेनल्टीवर केले. त्याच्याशिवाय उदांता सिंगने (Udanta Singh Kumam) एक गोल केला आणि भारताने 4-0 अशी आघाडी घेतली होती.

पाकिस्तानचा संघ : साकिब हानिफ, इसाह सुलिमन, मुहम्मद उमर हयात, मुहम्मद सुफयान, अब्दुल्ला इकबाल, ममून मूस्सा खान, ओटिस जान, मोहम्मद खान, रहिस नबी, हस्सन नवीद बशीर, हरुन आरशिद हमिद, अली उझैर महमूद

भारतीय संघ : अमरिंदर सिंह, सुनील छेत्री, शुभाषिश बोस, अन्वर अली, संदेश जिंगान, अनिरुध्द थापा, अब्दुल समद, जिक्सन सिंग, लल्लीन्जुला छांगटे, प्रितम कोटल, आशिक कुरुनियन