आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हॉकीची फायनल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

Updated: Oct 28, 2018, 11:54 AM IST
आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हॉकीची फायनल

मस्कट : भारतीय पुरुष हॉकी संघानं एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. उपांत्य फेरीत भारतानं जपानला ३-२ नं पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी रंगणार आहे.

जपानविरुद्ध भारताकडून गुरजंत सिंग, चिंगलेनसना आणि दिलप्रीत सिंगनं गोल झळकावले. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये गोल झळकावत भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानला पराभवाचा धक्का दिला.

मस्कट येथे आज रात्री १० वाजून ४० मिनिटांनी भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे.