IND vs SA ODI : कसोटी गमवल्यानंतर वन डेसाठी टीम इंडियाने कसली कंबर, काय सांगतात Head to Head अंदाज

काय सांगतात Head to Head अंदाज, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर पडणार का 'भारी'? 

Updated: Jan 18, 2022, 09:06 PM IST
IND vs SA ODI : कसोटी गमवल्यानंतर वन डेसाठी टीम इंडियाने कसली कंबर, काय सांगतात Head to Head अंदाज title=

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सीरिज गमावल्यानंतर आता वन डे सीरिज टीम इंडियाला जिंकायची आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे सीरिज बुधवारपासून सुरू होत आहे. ही 3 सामन्यांची वन डे सीरिज दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

कसोटी सीरिजमध्ये पहिला सामना जिंकला मात्र दोन्ही सामने गमवले आहेत. आता वन डे सीरिजमध्ये आधीचा रेकॉर्ड काय सांगतो आणि आता जिंकण्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याशिवाय कोणत्या नव्या खेळाडूंना संधी के एल राहुल देणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टीम इंडियाला वन डे सीरिज जिंकून याची भरपाई करायची आहे. त्याचबरोबर यजमान दक्षिण आफ्रिका कसोटीनंतर वन डे सीरिज आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. वन डे सीरिजमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली आहे जाणून घेऊया हेड टू हेड 

आतापर्यंत दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 84 सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी 3 सामने अनिर्णयीत ठरले आहेत. 35 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर 46 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 46 सामने जिंकले आहेत. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया गेली होती. त्यावेळी सीरिज 5-1 ने जिंकली होती. 

दक्षिण आफ्रिकेने सर्वात जास्त सामने मिळाले आहेत. मागच्या काही सामन्यांचे निकाल पाहिले तर ते भारताच्या बाजूने आहेत. यावेळी टीम इंडियाला विजय मिळवायचा आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर आहे. के एल राहुल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. तर बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. 

भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.